तारदाळ – विजय मकोटे
दि .१४ : मागील 20 वर्षात तारदाळ आणि खोतवाडी गावंचा सर्वांगीण विकास आम्हीच केला हे छाती ठोकपणे जाहीर सभेत सांगायला तयार आहोत. विकासाच्या केवळ गप्पा मारणार्या विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर यावे सवाल-जवाब करण्यास आम्ही तयार आहोत असे आव्हान आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले. दोन्ही गावाच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना भक्कम साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जीकेनगर तारदाळ येथे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडेय यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार आवाडे बोलत होते. यावेळी दोन्ही गावातील ग्रामस्थ विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, गावातील प्रलंबित कामे मार्गी लागण्यासह गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी निधीची आवश्यकता असते. आणि केंद्र व राज्यात जर महायुतीची सत्ता असेल तर गावाचा कायपालट होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी राज्यात महायुतीची सत्ता यावी म्हणून युवा उमेदवार राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करुन विधानसभेत पाठवूया. त्यासाठी सर्वांनी मतरुपी आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रसाद खोबरे, यशवंत वाणी, राजवर्धन नाईक-निंबाळकर, अमोल माळी, संतोष कांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सरपंच पल्लवी पोवार, उपसरपंच प्रविण पाटील, अंजना शिंदे, विजय पाटील, चंद्रकांत चौगुले, वृषभ जैन, शोभा माळी, राणी शिंदे, प्रकाश खोबरे, के. जी. पाटील, जावेद कन्नुर, सचिन पवार, रणजीत पवार, दत्तात्रय कनुकले, मारुती जाधव, शाहु जगदाळे, किरण साखळकर, इकबाल मकानदार, तौफिक शिरगुप्पे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित खोत व रणजित माने यांनी केले.