कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी व इचलकरंजीच्या विकासासाठी आपण इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार:

भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके यांची पत्रकार परिषेदेत माहिती .

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि १८ :भारतीय जनता पार्टीने आवाडे घराण्यात विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरवल्याने कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी व इचलकरंजीच्या विकासासाठी आपण इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याची माहिती भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.

यावेळी बोलताना शेळके त्यांनी आपण भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी गावोगावी प्रयत्न केले. इचलकरंजी विधानसभेत दोन वेळा आमदार निवडून दिले, कोल्हापूर जिल्हयात प्रथमच विधानसभेत भाजपचे कमळ फुलले मात्र प्रदेश भाजपाने निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून ज्याच्याशी संघर्ष केला अशा आवाडे घराण्यात पक्षाने उमेदवारी देण्याचे ठरविल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका रुजलेली नाही. भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष असताना चंदगड पासून शिरोळ पर्यंत तसेच कागलपासून हातकणंगले पर्यंत गावोगावी जाऊन पक्ष शाखा स्थापन केली व पक्षाची ध्येय धोरणे पोचवण्याचा प्रयत्न केला. सन २००४ साली भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी तात्कालिन उमेदवार प्रकाश आवाडे यांनी सत्तेच्या बळावर माझा उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद केला. त्याचप्रमाण २००१ साली इचलकरजीतील दगलीमध्ये जाणून बुजून बळाचा वापर करून माझ्यावर व माझ्या सहकार्यावर मारहाण केली. इचलकरंजी मतदार संघात भाजपा पक्ष मजबूत करण्याचे काम करणारे भाजपा प्रदेश उपाध्या माजी आमदार सुरेशराव हाळवणकर हे सक्षम उमेदवार असताना तसेच पक्षातील माझ्यासह अलका स्वामी, सुनिल महाजन, तानाजी पोवार, या सारख्या अनेक नेतेमंडळी विधानसभेसाठी इच्छुक असताना आयात उमेदवार आम्हास मान्य नाही. मी नगरसेवक व नगराध्यक असताना इचलकरंजी परिसरात केलेल्या कामामुळे येणाखा निवडणूकीत मतदार माझ्या पाठीशी राहील. स्व. बाळासाहेब  माने यांचा विचाराचा वारसा जपत  गेली अनेक वर्ष स्वाभिमानाने सामाजिक, राजकीय कार्यात सहभाग घेतला आहे मतदार संघातील लोक व आवाडे व त्यांच्या घराणेशाहीला कंटाळे  असून सक्षम पर्याय शोधत आहेत .तो आपण निश्चित देऊ इचलकरंजी विधानसभा मतदार संघात  खोतवाडी, कोरोची , शहापूर ,कबनूर, चंदूर ह्या. परिसरात आपल्याला मानणारे  कार्यकर्ते मोठ्‌या संख्येने आहेत . या स्वाभिमानी कार्यकत्यांच्या जोरावर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून  लढवणारच  असा ठाम निर्णय त्यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केला, या वेळी विवेक  शेळके ,तमन्ना कोटगी ,अतुल शेळके ,बाळासो मोहिते आदी उपस्थित होते