कबनूर : मुस्लिम समाजाची ऐतिहासिक बैठक; ‘समस्त मुस्लिम समाज, कबनूर’ संघटनेची स्थापना — नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि .२२ नोव्हेंबर २०२५) : कबनूर गावात मुस्लिम समाजाची महत्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत ‘समस्त मुस्लिम समाज, कबनूर’ या नव्या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नव्या कमिटीचे पदाधिकारी
अध्यक्ष : हाजी जावेद गुलाब फकीर
उपाध्यक्ष : अल्ताफ बशीर मुजावर
सचिव : रियाज चिक्कोडे
खजिनदार : महंमद नाकाडे (सर)
शासकीय कामकाज प्रमुख : दिलावर बाबासो पटेल
कायदेशीर सल्लागार : अॅड. परवेझ पापालाल सनदी

प्रसिध्दी प्रमुख
फिरोज शेख (पत्रकार)
चंदूलाल फकीर (पत्रकार)
टिप्पू सनदी (पत्रकार)
या बैठकीत कबनूरमधील प्रत्येक भागातून निवडलेल्या एकूण ३२ सदस्यांची कमिटीही मंजूर करण्यात आली.

समाजहिताचे ठरवलेले उपक्रम
नवीन कमिटीच्या माध्यमातून खालील उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला :
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम
तरुण पिढीला व्यसनमुक्तीबाबत जागरूक करणे
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत
गरजूंना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन
तरुणांना व्यावसायिक बनविण्यासाठी प्रशिक्षण व उद्योजकता प्रोत्साहन
सर्व धर्मीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न
तरुणांना शासकीय सेवांमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन
समाजात सर्वधर्म समभाव व भाईचारा वाढविण्यासाठी उपक्रम

प्रतिष्ठित नागरिकांचा गौरव
या वेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
संघटनेच्या स्थापनेत ज्यांचे मोलाचे योगदान
संघटना स्थापनेत खालील मान्यवरांचा विशेष सहभाग राहिला :
अल्ताफ जकाते सर, डॉ. आसिफ फकीर, इस्माईल शेख, दिलावर पटेल, जावेद इनामदार, तोहीद जिनाबडे, राजू मुल्ला, हुसेन मुजावर, समीर जमादार, सैफ मुजावर, समीर सनदी, शकील मुल्ला, मुन्ना लाहोरी, दस्तगीर मुजावर, तौफिक पटेल, करीम सनदी, नजरुद्दीन मुजावर, राजू मुल्ला (गंगानगर), मुन्ना पिरजादे, शकील मुजावर, असगर मुजावर, मुस्तफा शेख, नबी जमादार, राजू मिसूडगी, कलंदर जमादार, ताज मुल्ला, खुदबूद्दीन म्हालदार, कमाल मुजावर, अशपाक मुल्ला, इजामुल मुजावर, गुलफाम शेख तसेच इतर नागरिकांनी परिश्रम घेऊन ही संघटना उभी केली.
कबनूरमध्ये स्थापन झालेली ही संघटना सामाजिक प्रबोधन, युवकांचा विकास व समाजहिताच्या प्रकल्पांमुळे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.