श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
रत्नागिरी : दीपक तूळसणकर
दि.२३ : श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी व संगमेश्वर तालुका युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटक श्री निलेशजी कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच नोंदणीकृत श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी संस्थेचा उद्घाटन सोहळा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमास कडवई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कुवळेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संतोष थेराडे, कुंभार समाज जिल्हाध्यक्ष श्री सुभाषराव गुडेकर, उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर, ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन मालवणकर, युवा प्रतिष्ठान व संगमेश्वर तालुका युवा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेले सर, ९३ वेळा रक्तदान केलेले चितळे सर, तसेच गुहागर तालुक्यातील युवा नेतृत्व व सामाजिक क्षेत्रात कार्यरत रक्तदाते श्री उमेशजी खैर यांची विशेष उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास हजेरी लावून उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अनेक युवा रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. समाजहिताच्या कार्यासाठी एकत्र येण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.