इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर संपन्न

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि .५ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ चे अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्हि.एम. हाताळणी (Hands On Trainning) प्रशिक्षणाचे आयोजन डि. के. टी. ई इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज, इचलकरंजी येथे रविवार दि. ०४ जानेवारी आणि दि.०५ रोजी सकाळी १०.०० ते १.०० आणि दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात निवडणुक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आले होते.


यामध्ये मतदान केंद्र निहाय मतदान केंद्राध्यक्ष १, मतदान केंद्र अधिकारी क्रमांक १, मतदान केंद्र अधिकारी क्रमांक २ आणि मतदान केंद्र अधिकारी क्रमांक ३ असे प्रत्येक केंद्रावर ४ अधिकारी असे एकुण १२०८ आणि राखीव १०% असे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेले आहे.
निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण एल.ई.डी. स्क्रीनवर पी.पी.टी.च्या माध्यमातून उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त राहुल मर्ढेकर, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण, बाबासाहेब वाघमोडे, ओमप्रकाश यादव आणि प्रशिक्षण विभागाचे नोडल अधिकारी विजय राजापुरे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले सदर दोन दिवसांच्या प्रशिक्षणास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय अधिकारी तसेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी नियुक्त करणेत आलेले जवळपास १३२० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या मतदान अधिकारी प्रशिक्षण आयोजन करणेसाठी सहा आयुक्त आस्थापना सुनिल शिंदे यांचेसह प्रकाश कुंभार, अजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.