महापौर–उपमहापौर पदग्रहण सोहळा उत्साहात; शहर विकासासाठी निष्ठेचा संकल्प
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.१४: इचलकरंजी महानगरपालिका येथे आज महापौर व उपमहापौर पदांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. शहराचे प्रथम महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी विधिवत पदभार स्वीकारला.

या प्रसंगी आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, भगतरामजी छाबडा तसेच महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करून पदभार स्वीकारला.

मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन व नागरिकांनी दाखविलेला विश्वास हीच पुढील कार्याची प्रेरणा ठरेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठा, पारदर्शकता व उत्तरदायित्वाने काम करण्याचा संकल्पही नव्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या सोहळ्यास सहकारी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिकेचे अधिकारी–कर्मचारी, मित्रपरिवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.