ताराराणी पक्ष कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी प्रतिनिधी

दि.2 मे 2022 – ताराराणी पक्ष कार्यालयात पारंपारिक तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमास अरुण आवळे, महादेव कांबळे, दीपक सुर्वे, प्रशांत कांबळे, रमेश कबाडे, बाळासाहेब कलागते, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, सर्जेराव पाटील, चंद्रकांत इंगवले, नाना पाटील, बंडोपंत लाड, राजू बोंद्रे, शंकर येसाटे, सुरेश कोल्हापूरे, नौशाद जावळे, सतिश कोष्टी, शिवाजी काळे, प्रविण केसरे, अनिल शिकलगार, दयानंद शेटके, संजय आरेकर, राहुल घाट, सुहास कांबळे, महेश सानीकर, नजमा शेख, सौ. सुवर्णा लाड, मंगल सुर्वे, तुळसा काटकर, सिध्दार्थ कांबळे, महावीर कुरुंदवाडे, राजू माळी, बजरंग कुंभार, मनु फरास, फहीम पाथरवट, तौफिक जमादार, रंगा लाखे, राजू दरीबे, मुरारजी देसाई, अतुल सुस्वरे, रमेश पाटील, राजेंद्र बचाटे, अभिमन्यू कुरणे, दत्तात्रय कनोजे, संग्राम सटाले, विजय चव्हाण, बाबु रुग्गे, वसंत येटाळे, दीपक केंगार, सुभाष जाधव, चंद्रकांत पाटील, शिवाजी माळी आदींसह आवाडे समर्थक, ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.