जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: मार्च २०२३ मध्ये सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिरोळ तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता, परंतु यातील काही रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झाले यामुळे या मंजूर झालेल्या रस्त्यांच्या जागी नवीन रस्ते सुचवावेत व त्याबाबतचा नवीन प्रस्ताव सादर करावा अशा सूचना संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने २८ मे २०२३ रोजी नवीन रस्त्यांसाठीचा बदल प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला होता, यावर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तातडीने कार्यवाही होण्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यामुळे नव्याने पाठवलेल्या या प्रस्तावातील रस्त्यांसाठी १ कोटी ९० लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे
नव्याने मंजूर झालेल्या या निधीमधून कोथळी चुडाप्पा मळा ते नदी पानवठा रस्ता सुधारणा करणे कामासाठी ५० लाख रुपये, शिरटी ते घालवाड ग्रामीण मार्ग १५ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे कामासाठी ४० लाख रुपये, प्रजीमा ३२ पासून नवे दानवाड ते दड्डी रस्ता ग्रा.मा.१४४ ची सुधारणा करणे यासाठी ६० लाख रुपये, तसेच जुगूळ राज्य हद्दीपासून आलास ,बुबनाळ औरवाड रस्ता इ.जी.मा. ४६ ची सुधारणा करणे यासाठी ४० लाख रुपये असा एकूण १ कोटी ९० लाखाचा निधी मंजूर झाल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे. शिरोळ तालुक्यातील या महत्त्वाच्या रस्ते मजबूत व्हावेत अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती तालुक्यातील या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.