आमदार आवाडे यांच्या वस्त्रोद्योग संदर्भातील नव्या संकल्पनाच्या माध्यमातून तरुणांसाठी नवा प्रकल्प उभारण्याचा विचार

मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचे संस्थेच्या ७९ वार्षिक सभेत प्रतिपादन
इचलकरंजी :सलीम माणगावे 
दि २७ : काळानुरुप बदल घडत चालल्याने नव्या इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात हातमाग टिकणे शक्य नाही. नवी वस्त्रे, नव्या स्पर्धा आणि नवे संशोधन यात हातमाग व्यवसाय लुप्त होत चालला असताना संस्थेने घेतलेले मूळ ध्येय बाजूला सारुन वस्त्रोद्योगाला बाजूला करुन थांबणे इष्ट नाही हा विचार उरी बाळगत नवनव्या कल्पना घेत वाटचाल सुरु ठेवली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे वस्त्रोद्योग संदर्भात अनेक योजना, नव्या संकल्पना आहेत. त्या माध्यमातून तरुणांसाठी नवा प्रकल्प उभारण्याचा विचार असून नव्या वातावरणात टिकण्याच्या दृष्टीने आणि सभासदांच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प पुरा केला जाईल, असेमध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले.
           मध्यवर्ती सहकारी हातमगार विणकर संघ या संस्थेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. दत्तवाडे बोलत होते. याप्रसंगी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती गलगले यांनी केले. श्रध्दांजली ठरावाचे वाचन संचालिका सौ. भारती जानवेकर यांनी केले.
संस्थेचे सध्या १८५० इतके क्रियाशील सभासद असल्याचे सांगत अध्यक्ष दत्तवाडे यांनी, संस्थेच्या कार्याचा आढावा घेत  इचलकरंजी वस्त्रोद्योगाच्या बाबतीत आणि गारमेंटच्या बाबतीत आशिया खंडातील आघाडीचे शहर म्हणून नांवलौकिक मिळवत आहे. या वाटचालीत आमच्या संस्थेचाही वाटा आहे. आणि हा वाटा स्विकारत आपल्यालाही काही नवे उत्पादन करता येते काय या विचाराचा मागोवा घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगत सभासदांना १२% इतका लाभांश देण्यात येत असल्याचे सांगितले.
नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन सेक्रेटरी महेश पाटील यांनी केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. यावेळी मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल कामगार नेते शामराव कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले. आभार संचालक शिवबसु खोत यांनी मानले.
याप्रसंगी विलास गाताडे, सुनिल पाटील, चंद्रकांत इंगवले, एम. के. कांबळे, बाळासाहेब कलागते, बाबासाहेब पाटील, नंदु पाटील, सौ. उर्मिला गायकवाड, डी. एम. बिरादार, दिपक सुर्वे, नरसिंह पारीक, सर्जेराव पाटील,  राहुल घाट आदींसह संचालक विश्‍वनाथ अग्रवाल, शिवानंद बन्ने, मनोहर काकडे, धैर्यशील लोखंडे, श्रीमती सुधार जाधव, चंद्रकांत मांगलेकर, शिवानंद घोडके, राहुल बंडगर, जयवंत म्हेतर आदींसह सभासद उपस्थित होते.