कोल्हापुरात 25 कोटींचा ‘आमदार’, जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा

जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा भीमा कृषी प्रदर्शनात

कोल्हापूर : प्रतिनिधी 

दि .२१ :  कोल्हापुरात २५ कोटींचा ‘आमदार’ पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात लोकांची तुडुंब गर्दी झाली आहे   हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे.पानिपतवरून थेट कोल्हापुरात आणलेला  हा आमदार म्हणजे जगातील सर्वात मोठा रेडा आहे . कदाचित याच  नाव ऐकून सर्वाना आश्चर्य वाटेल, पण खरोखरच या रेड्याच  नाव आमदार आहे.

४ वर्षाचा असलेल्या  ‘आमदार’चं  वजन तब्बल दीड टन, उंची ६ फूट, लांबी १४  फूट आणि किंमत तब्बल २५  कोटी आहे . देशात कुठेही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकचं लागतो.या  भर-भक्कम शरीरयष्टी, देखणं रूप आणि २५  कोटी किंमत च्या रेडां  पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्हातील लोकांची रीघ लागली आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणे तसेच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतात. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपतमधून आलेला नरेंद्र सिंह यांचा आमदार रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार रेड्याचा दिवसभराचा खुराक :

– रेड्याच्या सेवेसाठी  शारीरिक मसाजसाठी एक  तर चारा आणि देखभालीसाठी एक असे दोघे असतात .
दिवसाला २०  लिटर दूध, २०  किलोफिड आणि ३०  किलों चारा आणि भुसा या रेड्याचं दिवसभराचं खुराक आहे
– दिवसभरातून तीन वेळा रेड्याला आंघोळ घातली जाते.
– वातानुकूलित कक्षातच रेड्याची दररोज देखरेख असते .

जगातील सर्वात महागडा आणि महाकाय रेडा म्हणून या रेड्याची ओळख आहे. सात वेळा तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे.

#mla#aamdar#khrushi pradarshan%bhima khrushi#