मैत्री सामाजिक संस्थेच्या कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाचा थरारक विजय!

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १६ संघांचा सहभाग; रोशन कांबळे ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’, अचल बाटले ‘बेस्ट रेडर’, दिनेश कांबळे ‘बेस्ट डिफेंडर

*कडवई (ता. संगमेश्वर):*
मैत्री सामाजिक संस्था, कडवई ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे. संस्थेच्या मैत्री संघाने आजपर्यंत अनेक गुणवंत व कुशल युवा कबड्डीपटूंना घडवले असून, तालुक्यातील नामवंत खेळाडू या संघातून खेळताना दिसतात. या संघाने युवकांमध्ये शिस्त, चिकाटी, समर्पण आणि संघभावना निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

या संस्थेचे अध्यक्ष श्री. महेंद्र जाधव असून सचिव श्री. मिलिंद कडवईकर सर हे उत्कृष्ट शिक्षक, पत्रकार, प्रशिक्षित कबड्डीपटू व संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे उपसचिव म्हणून ओळखले जातात. ते स्वयं मैत्री संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित *तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाने अंतिम फेरीत नवयुवक खरशेत बाटलेवाडी संघावर एका गुणाने थरारक विजय मिळवत विजेतेपद पटकावले.*
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. मैत्री कडवई या यजमान संघाने तृतीय क्रमांक मिळवला, तर नाचरेवाडी (आरवली) संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
*स्पर्धेतील विशेष पुरस्कारांचे मानकरी:*
सर्वोत्कृष्ट खेळाडू: रोशन कांबळे (माळवाशी)
बेस्ट रेडर: अचल बाटले (बाटलेवाडी)
बेस्ट डिफेंडर: दिनेश कांबळे (माळवाशी)

*स्पर्धेस उपस्थित मान्यवर:*
सहदेव बेटकर, संतोष थेराडे, चंद्रकांत जाधव, दत्ताराम ओकटे, दत्ताशेठ लाखण, अरविंद जाधव, निलेश कुंभार, डॉ. भगवान नारकर, प्रदीप कानाल, राज बोथरे, प्रमोद कडवईकर यांच्यासह संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे मुजीब खान, वहाब दळवी, नियाज खान, दीपक तुळसणकर यांनी उपस्थिती दर्शवली.

*सहकार्य व संयोजन:*
या स्पर्धेसाठी सहदेव बेटकर, संतोष थेराडे, प्रशांत यादव, सुधीर सुर्वे, अरविंद जाधव, चंद्रकांत जाधव, दी एज्युकेशन सोसायटी कडवई, अमित उजगावकर, शशिकांत घोसाळकर, अक्षय यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*यशस्वी आयोजनासाठी मेहनती कार्यकर्ते:*
अध्यक्ष महेंद्र जाधव, सचिव मिलिंद कडवईकर, खजिनदार मोहित पंडव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश माने, महेश साळुंके, केतन ओकटे, रुपेश दहिवळकर, विकास धामणाक, सुनील पाचकुडे, सर्वेश सुर्वे, आकाश पाले, दिप्तेश जोशी, यश भडवळकर, आयुष भडवळकर, यश गुरव, राजू चांदे, मंजुश्री कडवईकर, पारस बाईत, साईराज सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

*सूत्रसंचालन:* सुनील शिगवण
*पंच:* ओंकार पातेरे, मनीष बांडागळे, ओंकार वासकर
*वेळाधिकारी:* संतोष फुटक