श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

इचलकरंजी :विजय मकोटे 

        दि. १६  मे :  फेब्रु. / मार्च, २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश प्राप्त केले.१२ वी चा कॉमर्स विभागाचा निकाल ९८.४८% तर आर्ट्स विभागाचा निकाल ९३.६७ % लागला.
गुणवंत विद्यार्थिनींमध्ये कॉमर्स मधील कु. पाटील प्रतीक्षा बाबासो, हिने ९०.३३ % इतके गुण मिळवून कॉमर्स विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. कु. चौगुले तेजश्री कल्लाप्पा, हिने ८०.८३ % मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तसेच कु. पाटील मनस्वी अजित हिने ७९ .३३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. आर्टस् विभागामध्ये कु. कुलकर्णी राणी मिलिंद, हिने ८७.१७% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाच्या कु. वैभवी दिग्विजय कुलकर्णी, हिने ८५.८३% गुण प्राप्त केले तर कु. डोंगळे नयन रवींद्र हिने ८५.३३% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला
कॉमर्स विभागाची कु. पाटील प्रतीक्षा बाबासो हिने एस. पी. या विषयात १००  पैकी ९९  गुण प्राप्त केले. बोर्ड परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री अहमद मुजावर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्री श्रीनिवासजी बोहरा, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेश बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही. जी. पंतोजी, उपमुख्याध्यापक श्री व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील पर्यवेक्षक श्री एस. एस. कोळी तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून प्रशालेला हे यश प्राप्त झाले.

#ssc result#ichalkaranji#