संगमेश्वर, कोंडअसुर्डे येथे कुमारी ज्ञानसी पोवळे हिचा गौरव समारंभ संपन्न

कडवई – 

संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री. प्रमोद शंकर पोवळे यांची नात, कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे हिने आपल्या उज्वल कामगिरीने गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ज्ञानसीने ब्रेन डेव्हलपमेंट एक्झामिनेशन (BDS) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत १०० पैकी ९१ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली असून, चंद्रनारायण बलदवा इंग्लिश मिडियम स्कूल, जयसिंगपूर या शाळेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले आहे. विशेष म्हणजे तिने या परीक्षेत देशपातळीवर ७०वा क्रमांक मिळवला आहे.

त्याचप्रमाणे, ‘श्री समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षा’ या दुसऱ्या परीक्षेत देखील ज्ञानसीने १०० पैकी ८६ गुण मिळवत आपल्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ज्ञानसीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री. महेश मुरकर, एस.टी. कर्मचारी (चिपळूण डेपो) श्री. विनायक संसारे, समाजसेवक व कायदासाथी श्री. दिनेशभाई अंब्रे आणि इतर नातेवाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

या वेळी ज्ञानसीचे पालक श्री. प्रशांत पोवळे व सौ. प्राजक्ता पोवळे, श्री. चंद्रकांत कारेकर व सौ. प्रगती कारेकर तसेच ज्येष्ठ नागरिक श्री. प्रमोद शंकर पोवळे हे उपस्थित होते.

ज्ञानसीच्या या यशस्वी वाटचालीत सौ. एस. व्ही. पाटील मॅडम आणि श्री. राघव पुजारी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.