थोर समाजसुधारक’ पुस्तकास राज्यस्तरीय स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार

कराड :प्रतिनिधी 

दि .५ :अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार सोहळा २०२५ कराड येथे संपन्न झाला. या सोहळ्यात सौ. शीला सतीशकुमार माने लिखित ‘थोर समाजसुधारक’ या पुस्तकाला राज्यस्तरीय स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण कल्पना चावला विज्ञान संस्थेचे डॉ. संजय पुजारी, लेखक व प्रकाशक मा. विक्रम शिंदे (पुणे), पिराजी थोरवडे, तसेच आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार मा. अशोक सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी सत्यवान मंडलिक, दशरथ पवार, सतीशकुमार माने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त झालेल्या लेखिकेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, समाज सुधारकांचे कार्य समोर मांडणाऱ्या या पुस्तकास समाजात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

# awards # shella mane#