सांगली: राम आवळे
दि १५ : दक्षिण भारत जैन सभेचे ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) जुलै रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी) येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे भूषविणार असून या त्रैवार्षिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील हे आहेत.
अधिवेशन रविवार सकाळी अधिवेशन उद्घाटन व अध्यक्ष पदग्रहण सोहळा प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी व प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर यांच्या पावन सान्निध्यात संपन्न होईल.कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री नामदार सतिश जारकीहोळी व कर्नाटक राज्याचे नियोजन व सांख्यिकी मंत्री नामदार डी. सुधाकर हे प्रमुख अतिथी, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार महेंद्र तमण्णावर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अभय पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहूल आवाडे यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विद्यमान व माजी आमदार, खासदार, विविध आर्थिक व सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व चेअरमन रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी डी.सी.सदलगे यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. श्रावकरत्न स्व. रावसाहेब आ. पाटील (दादा) नगरचे उद्घाटन श्री. जिन्नाप्पाण्णा अस्की तर शांतिपीठ उद्घाटन इरगौडा धुळगौडा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे दीपप्रज्वलन डॉ. महावीर दानिगोंड यांच्या हस्ते होईल. त्यानंतर जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती, सेवा दल मध्यवर्ती समिती, पदवीधर संघटना या शाखांची अधिवेशने होतील.
सोमवार, दि. २१ जुलै रोजी सकाळी दक्षिण भारत जैन सभेच्या विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. यावेळी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, बेळगावचे पालकमंत्री सतिश जारकीहोळी व कर्नाटक राज्याचे नियोजन व सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर हे प्रमुख पाहुणे आहेत. माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी व आमदार महेंद्र तमण्णावर यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन होईल. दुपारी दोन वाजता दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कामकाज संपन्न होईल.
यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातील या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, स्वागताध्यक्ष उत्तम रावसाहेब पाटील, द.भा.जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील, व्हा.चेअरमन माधव (दत्ता) डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील, खजिनदार संजय शेटे व सहखजिनदार अरविंद मजलेकर, पेट्रॉन ट्रस्टी अभिनंदन रावसाहेब पाटील, ट्रस्टी अनिल बागणे, सुरेश रोटे उपस्थित होते.