इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि १९ जुलैः येथील डीकेटीईच्या इएनटीसी व इलेक्ट्रीकल विभागातील तब्बल ३२ विद्यार्थ्यांची सेडेमॅक या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.सेडेमॅक ही एक प्रमुख नियंत्रण उत्पादक कपंनी असून जी ऑटोमोटिव्ह, जनसेटस आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी पॉवरट्रेन कंट्रोलर्स तयार करते. पुणे स्थित या कंपनीला तिच्या अभिनव तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.या कॅम्पस इंटरव्हयूव मधून डीकेटीईच्या इएनटीसी विभागातून २४ तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील ८ अशा एकूण ३२ विद्यार्थ्यांची सेडेमॅक या इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली आहे.
उद्योग जगतातील गरजा ओळखून, डीकेटीईने अत्याधुनिक सॉफटवेअर्स, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग भाषांचे प्रशिक्षण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असलेले विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. विद्यार्थ्यांची टेक्नीकल स्न्लि, संवाद कौशल्य आणि सॉफट स्किल वाढवण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रॅम अयोजित केले जातात ज्यामुळे त्यांच्या प्लेसमेंटला अधिक बळकटी मिळते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये डीकेटीई ही संस्था नेहमीच आघडीवर आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.ए.पाटील, डॉ.आर.एन.पाटील,टीपीओ जी.एस. जोशी, टीपीओ कोऑर्डिनेटर डॉ.एस.जे.पाटील, प्रा. पी.एस.मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.