कडवई :दीपक तुळसणकर
दि.१४मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने आज दि. १२/१२/२०२५ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई येथे ग्रुप ग्रामपंचायत कडवई व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून दृष्टीदोष, मोतीबिंदू तसेच इतर नेत्रविकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजूंना पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला.
या कार्यक्रमास कडवई ग्रामपंचायत सरपंच सौं. विशाखा कुवळेकर मॅडम, उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी श्री. राहुलकुमार चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोळे मॅडम, भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवईचे शिक्षक प्रतिनिधी श्री. निलेश कुंभार सर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्री. रेवाळे साहेब, आरोग्य सेवक, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा मोफत उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. आयोजकांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.