राष्ट्रपिता महात्मा गांधी व अजितदादा पवार यांना शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

इचलकरंजी :बीब शेखदर्जी 

दि .३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
               यावेळी श्री. विशाल कांबळे व राजन मुठाणे यांच्या हस्ते महात्मा गांधी व अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी अधोरेखित केली. राज्याच्या प्रगतीसाठी अजितदादांच्या विचारांवर पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या श्रद्धांजली सभेस विधानसभेतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंगाडे, रवी वासुदेव, सचिन साठे, साजिद मकानदार, रविंद्र पाटील, अनिल पाच्छेदे, अनिल कदम, नासीर गवंडी, रमजान शिकलगर, चंद्रकांत मिश्रि, अण्णा कांबळे, दिलीप भोई, सुदाम साळुंखे, प्रशांत लोले, गजानन शिरगांवकर, राजू किणेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रम भावूक वातावरणात पार पडला.