परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व किर्तीवंत व्हा :मा.श्री.बी.बी.भंडारेसाहेब

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.३१: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिकविद्यामंदीर,मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्याप्रांगणात एस.एस.सी. व एच.एस सी. च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतनपर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी शिक्षणअधिकारी मा.श्री.बी.बी.भंडारेसाहेब होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शितलकुमार मणेरे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकमा.श्री.मनोज हिंगमिरे होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे सेक्रेटरीमा.श्री.अनिलकुमार मणेरे, सौ.ज्योती मणेरे, सौ.साक्षी मणेरे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोकवसगडे सर, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे मा.श्री.भंडारेसाहेब यांनी “परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनीजिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व किर्तीवंत व्हा" अशा शुभेच्छादिल्या. त्याचप्रमाणे विविध उदाहरणाद्वारे कठीण परीस्थीतीतही एखादी समस्या कशीसोडविली पाहिजे याचेही मार्गदर्शन केले. हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळेयांनी “परीक्षेच्या सर्व सूचना विद्यार्थ्यांना दिल्या” त्याचप्रमाणे संस्थेचेसमन्वयक मा.श्री.अशोकवसगडे सर यांनी “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण व सराव यांचे नियोजन असावेलागते. तसेच मा.श्री.शीतलकुमार मणेरे यांनी,विद्यार्थ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या वविद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इतर सर्व ट्रस्टींनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठीशुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.केतकी काळे प्रास्ताविक सौ. दिपाली चौगुले व आभार सौ.श्वेता लाटणे यांनी केले.याप्रसंगी हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, सर्व विभागाचेविभागप्रमुख,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.