मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ:हेमंत पाटील

भारत–ईयू एफटीए, यूएस टैरिफ सवलत केंद्र सरकारचे मोठे यश

पुणे:प्रतिनिधी
दि.४:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि अमेरिकेने भारतावर लादलेले टैरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा घेतलेला निर्णय, हे याचे उत्तम उदाहरण आहे,असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.४) केले.
युरोपियन आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, भारत–ईयू एफटीए अंतर्गत ईयू सुमारे ९९.५% व्यापार मूल्यावर लागू असलेले टैरिफ कमी करणार आहे.यामुळे भारताच्या वस्त्र, कापड, रसायने, औषधे, ऑटो घटक आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांसारख्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना युरोपीय बाजारात मोठे प्राधान्य मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.पंतप्रधान मोदी यांनी “मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल आणि एक्स्पोर्ट-लेड ग्रोथ” या धोरणांवर भर दिल्यामुळे भारताची निर्यात क्षमता सातत्याने वाढतेय. २०२४-२५ मध्ये भारत–ईयू वस्तू व्यापार सुमारे १३६. ५ बिलियन डॉलर इतका होता, जो येत्या काळात आणखी वेगाने वाढेल, असे पाटील म्हणाले.यामुळे आयात-निर्यात संतुलन सुधारेल, परकीय चलन साठा मजबूत होईल आणि लाखो नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होतील. दुसरीकडे, अमेरिकेने भारतावर लागू असलेला अतिरिक्त टैरिफ कमी करून सुमारे १८% पर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोदी सरकारच्या सशक्त कूटनीतीचा आणि जागतिक पातळीवरील विश्वासार्हतेचा परिणाम आहे.टैरिफ सवलतीचा सकारात्मक परिणाम रुपयाच्या मजबुतीकरणात आणि शेअर बाजारातील तेजीमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढला आहे.एकूणच, भारत–ईयू मुक्त व्यापार करार आणि अमेरिकेने दिलेल्या टैरिफ सवलती या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या घडामोडी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुसद्दी नेतृत्वामुळे भारत आज केवळ उदयोन्मुख अर्थव्यवस्था न राहता, जागतिक व्यापारातील निर्णायक शक्ती म्हणून पुढे येत आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे, असे पाटील म्हणाले.