संगमेश्वर: नियाज खान
दि.६:रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स सोहळा गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या मंगलप्रसंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार श्री. माईंगडे आणि सौ. माधवी गिते यांनी विशेष उपस्थिती लावून बाबांचे दर्शन घेतले. यावेळी माजी सरपंच श्री. विवेकभाई शेरे, माजी उपसरपंच श्री. गुलाम पारेख, श्री. संजय कदम, संगमेश्वर मापारी मोहल्ला जमातीचे अध्यक्ष श्री. राउफ खान, सामाजिक कार्यकर्ते रजिन खान, मुबीन पारेख, रमीज मापारी, राहील मापारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. गुलाम पारेख यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मौलवी यांनी ‘उमेदवार श्री. माईंगडे व सौ. माधवी गिते यांना निवडणुकीत उदंड यश मिळून ते बहुमताने निवडून येवोत’, अशी प्रार्थना (दुआ) हजरत हुसनेन शाह बाबांच्या दर्गेत केली. धार्मिक विधी आणि भक्तीमय वातावरणाने उर्स सोहळ्याची सांगता झाली.