प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.


यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या दालनात प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील विविध उद्योगसमूह, शासकीय कार्यालये तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


हे आयएएस प्रशिक्षणार्थी १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात मुक्कामी राहून विविध विभागांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. यावेळी प्रशिक्षणार्थींनी मसूरी येथील ट्रेनिंग सेंटरची प्रतिमा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेट म्हणून दिली.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त पारितोष कंकाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.