पुणे विधानभवनावर बसपाचा ‘विराट आक्रोश मोर्चा’

तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे : प्रतिनिधी

दि.३ जून बहुजन समाज पार्टीपुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर विराट आक्रोश मोर्चा‘ काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर निळं‘ झाले होते.सकाळी पुणे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत मोर्चाला सुरूवात करण्यात आली होती.बसपाचे प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेबमा.प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबप्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी बसपाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यात आली असली तरी महागाईने जनता होरपळत आहे. गॅस चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे यासर्व वस्तूंचे दर कमी करावे आणि महामगाईच्या दृष्टचक्रातून सत्ताधाऱ्यांनीसर्वजनांना‘ बाहेर काढावे,असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांनी उपस्थितांना संबोधित करतांना केले. मध्यंतरी राजकीय फायद्यासाठी अतित्व शून्य राजकारण्यांकडून राज्यभरासह देशातील धार्मिक वातावरण कलुषीत करण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा काढण्यात आला होता. या राजकारणामुळे देशभरातील एका विशिष्ट धर्मबांधवांमध्ये असुरक्षेची भावना आहे.धार्मिक द्वेष परसरवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्यामुळे असे समाजविधातक मुद्दे उपस्थित करीत द्वेष पसरवणाणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केली.

मोर्चात प्रदेश महासचिव मा.सुदीप गायकवाडप्रदेश सचिव मा.भाऊ शिंदे,मा.अजित ठोकळेमा.सुरेश गायकवाड,मा.सौ शीतलताई गायकवाड,बाळासाहेब आव्हारे,आप्पा साहेब लोकरेजिल्हा प्रभारी रमेश अप्पा गायकवाडमेहमूद जकातेअशोक गायकवाडसंजय सेंगडेबापू कुदळेजिल्हा उपाध्यक्ष मा.धम्मदीप लगाडेमहिला जिल्हाध्यक्ष मा.निधी वैद्यशहराध्यक्ष सुरेखा कांबळेयुवक आघाडी अध्यक्ष पुणे शहर सिद्धार्थ कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.