कडवई :
संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायतीची आज 19 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील युवा नेतृत्व रऊफ नूर खान यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत.नावडी येथील ग्रामसभेत दरवेळेस प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची नावे सुचविल्या जातात व एकमताने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड केली जाते.
सामाजिक कार्यकर्ते बशीर अली खान,सरपंच प्रज्ञा विश्वास कोळवणकर,उपसरपंच विवेक शेरे,माजी उपसरपंच संजय कदम,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिनेश आंब्रे,पल्लवी शेरे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेट्ये,सामाजिक मंचाचे सदस्य प्रकाश कोळवणकर यांनी शुभेच्छा दिल्या.