जर्मनी :. वृत्तसेवा
भाद्रपद महिना म्हटलं की सण उत्सव ची बरसात. हे सण अख्या जगभर साजरे केले जातात . विदेशातही भारतीय आपले सण उत्सव साजरे करतात. गणेश फेस्टिवल 2021 देखील विदेशात उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला.जर्मनीत देखील गणेश विसर्जनाचा उत्सव ढोलताशाच्या पथकासह धुमघडाक्यात साजरा करण्यात आला.
भाद्रपद महिना म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबर महिना या महिनात गणेश चतुर्थीचा सण संपूर्ण भारतात अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
भारताताील इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा येथे पारंपारिक पद्धतीने आणि लोकप्रियतेने हे सणोत्सव साजरे केले जातात. या उत्सवाबाबत विशेष सांगायचे झाले तर स्कॉटलंड, कॅनडा, मॉरिशस, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, बर्मा, युनायटेड सारख्या परदेशात स्थायिक झालेले भारतीय आपले सण परदेशात जल्लोशात साजरा करतात. आणि अमेरिके सारख्या परदेशात साजरा होणारा हा उत्सव एक आकर्षण ठरले आहेत.