रुई फाटा येथील सह्याद्री मल्टिपर्पज हॉल व लॉनचा उद्घाटन समारंभ थाटामाटात संपन्न

इचलकरंजीसलीम माणगावे 
दि .११ :मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी साकारलेल्या रुई फाटा येथील सह्याद्री मल्टिपर्पज हॉल व लॉनचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडीक, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व माजी आमदार तथा भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या मान्यवरांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
कोल्हापूर रोडवरील रुई फाटा येथे सुरेशदादा पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना एखादा छोटासा कार्यक्रम करता यावा या उद्देशाने सह्याद्री मल्टिपर्पज हॉल व लॉन साकारले आहे. अत्यंत आकर्षक व सर्वसुविधांनीयुक्त असे हे मल्टिपर्पज हॉल व लॉन सर्वांनाच आकर्षित करणारे आहे. याठिकाणी स्विमिंग टॅंक व वनराई झाडीही आहे.
या मल्टिपर्पज व लॉनचे उद्घाटन नुकतेच खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडीक आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेशदादा पाटील आणि सुहास सुरेश पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी मयुर उद्योग समुहाचे डॉ. संजय पाटील, यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अशोकराव माने, मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, शैलेश सातपुते, दिलीप मुथा आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.