महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन .आयोजित तालुकास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न

संगमेश्वर : सचिन पाटोळे 

 दि.१६  :      महाराष्ट्र शासन कृषी विभागआणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या वतीने दि १२ मार्च२०२४ रोजी   माटे- भोजने सभागृह ,देवरूख(संगमेश्वर) जि.रत्नागिरी येथे  तालुकास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा आयोजित करणेत आलेला होता .कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या प्रतिमेला आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली .यावेळी  सर्व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत चंदनाचे रोप देऊन करण्यात आले . कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी देवरूख मा श्री विनोद हेगडे  यांनी केली, सदरची कार्यशाळा उत्साहात पार पडली .
देवरूख च्या  तहसीलदार श्रीमती अमृता साबळे  यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नैसर्गिक शेतीमध्ये डिजिटल मीडियात चा प्रभावी वापर याविषयी मा. श्री हेमंत तांबे निवृत्त कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.नैसर्गिक शेती संकल्पना आव्हाने व महत्व याविषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन डॉ.श्री संदीप कांबळे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य सदस्य यांनी केले तसेच  PMFME व शेतकरी कंपनी स्थापन करणे याविषयी सखोल व सविस्तर मार्गदर्शन श्री अमर पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान याविषयी सखोल मार्गदर्शन मा श्री जालिंदर पांगारे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी तथा प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी यांनी केले  . स्मार्ट आणि AIF योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन मा.श्री अजय शेंडे  (नोडल अधिकारी स्मार्ट) तथा कृषी विकास अधिकारी जिप रत्नागिरी यांनी केले. सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती व वापर याविषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन मा. डॉ. श्री.संतोष वानखेडे  शास्त्रज्ञ नारळ संशोधन केंद्र यांनी केले. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती याविषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन डॉ.श्री मालशे सर प्रमुख, नारळ संशोधन केंद्र भाट्ये यांनी केले. पंचायत समिती अंतर्गत योजनांविषयी मा. श्री विनोद कुमार शिंदे सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता जीवामृत प्रात्यक्षिक उपस्थित शेतकरी यांना दाखवून करण्यात आले ,आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन श्री प्रभाकर कांबळे मंडळ कृषी अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमास वरील प्रमाणे व्याख्याते, मार्गदर्शक व अधिकारी वर्ग लाभले होते
तसेच सदरील कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी चिपळुण मा.श्री राजेंद्र माने , गट विकास अधिकारी देवरूख मा.श्री भरत चौगुले
सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती लाड मॅडम, मार्लेश्वर फळ प्रक्रिया उद्योगाच्या संचालिका श्रीमती नेहा माने मॅडम, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.युयुत्सु आर्ते ,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचे फिरते कृषी चिकित्सालय,कृषी विभाग देवरूख येथील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, पत्रकार प्रतिनिधी महिला बचत गट सदस्य,माविम गटाचे संचालक, सदस्य, CBO संचालक, सदस्य, FPO संचालक, सदस्य,
SHG संचालक, सदस्य,सेंद्रिय शेती गटाचे संचालक, सदस्य,स्मार्ट कंपनी यांचे संचालक, सदस्य,संगमेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मा.सरपंच मा. उपसरपंच सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी व महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.