कडवईत वीज पुरवठा वारंवार खंडित;१२ तास उलटून गेले बत्ती गुल, ग्रामस्थ वैतागले!
कडवई:(२२/०५/२४)
संगमेश्वर तालुक्यातील येथील कडवई परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ वैतागले आहे.
पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे.कडवई परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.