कोल्हापूर :प्रतिनिधी
दि २२ :कागल येथे तहसिल कार्यालयात काम करणारी महिला कारकून हिला ३० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तिला न्याया लायापुढे हजार केले असता तिला १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनवली आहे
श्रीमती अश्विनी अतुल कारंडे (रा. लक्षदीपनगर, कोल्हापूर) असे त्या महिलेचे नाव आहे .याबाबत लाच लुचपत विभागा कडून मिळालेली माहित अशी कि यातील तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी भाडे करारावर कागल तालुक्यात जमीन घेतली आहे. ही जमीन एनए करण्याकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मूळ मालकाच्यावतीने अर्ज केला होता. या जमिनीच्या एनएचे कामाकरिता तक्रारदार यांच्याकडे अव्वल कारकून कारंडे यांनी ६० हजार रुपयांच्या लाचेच मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये रक्कम घेऊन येण्यास सांगितले .याबाबत तक्रारदार याने लाच लुचपत विभागा कडे तक्रार केली होती .तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना कारंडे यांना पकडण्यात आले.कारंडे यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कोर्टात हजार केले असता तिला १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनवली आहे.
उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील यांनी ही कारवाई केली