जवाहर मध्ये 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी मोळी पूजन
इचलकरंजी :प्रतिनिधी
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 या 29 व्या ऊस गाळप हंगामासाठी काटा पूजन तसेच मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. किशोरी आवाडे या उभयतांच्या हस्ते आणि कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, संचालक, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काटा पूजन, मोळी पूजन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून मुहुर्त करण्यात आला.
कारखान्याकडे सन 2021-22 हंगामाकरीता सुमारे 20 हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. मागील हंगामाप्रमाणेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांनी चालू गाळप हंगामातही आपला संपूर्ण ऊस जवाहरकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले. चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज होत असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे असे सांगून सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी अधिकारी-कर्मचारी या सर्वांना गाळप हंगामाच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कारखान्याच्या सभासदांना मागणीनुसार ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमी देण्यात येते. ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकर्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत असल्याचे नमुद केले.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे आणि संचालक सर्वश्री विलास गाताडे, आण्णासो गोटखिंडे आदगोंडा पाटील, बसगोंडा पाटील (कुगे), सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी गौतम इंगळे, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे आणि कार्यकारी संचालक व सर्व अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.