इचलकरंजी मर्चंटस् बँकेस 47.59 लाखाचा निव्वळ नफा
बँकेची सन 2020-21 सालची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या सभागृहात संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
कोरोना महामारी काळातसुध्दा सभासद, ठेवीदार, हितचितकांनी बँकेवर दाखविलेला विश्वास, संचालक मंडळ आणि कर्मचार्यांनी केलेली कामगिरी यामुळे बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अहवाल सालात बँकेस 1 कोटी 82 लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला असून इन्कम टॅक्स व अन्य तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 47 लाख 59 हजार रुपये इतका झाल्याची माहिती इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील यांनी दिली.
येथील दि इचलकरंजी मर्चंटस् बँकेची सन 2020-21 सालची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या सभागृहात पार पडली. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व लक्ष्मी प्रतिमा पूजनाने सभेची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक बँकेचे ज्येष्ठ संचालक विलास गाताडे यांनी केले. बँकेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब बरगाले यांनी श्रद्धांजली ठराव मांडून बँकेचे माजी चेअरमन जाधवजी पटेल तसेच अहवाल सालातील मृत व्यक्ती व सभासदांना श्रद्धांजली अर्पण केली.
सन 2020-21 या आर्थिक सालचे अहवाल वाचन व अध्यक्षीय मनोगत चेअरमन राजगोंडा पाटील यांनी, बँकेकडे एकूण ठेवी 127 कोटी 92 लाख इतक्या असून एकूण कर्ज वाटप 69 कोटी 40 लाख रुपये केलेचे नमूद केले. बँकेची एकूण गुंतवणूक 57 कोटी 28 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून बँकेस लेखापरीक्षण वर्ग अ प्रदान केलेचे सांगत बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षी आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नमूद केले. त्यानंतर सभा नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे जनरल मॅनेजर दिपक काटकर यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजूरी दिली. आभार बँकेच्या संचालिका सौ. विजयश्री गौड यांनी मानले.
सभेस जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले, संचालक आदगोंडा पाटील, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे व संचालक, बँकेचे संस्थापक चेअरमन इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे, राजकुमार पाटील, राजेंद्र शिरगुप्पे, गजानन लोंढे, दशरथ मोहिते, व्यंकटेश शहापूरकर, संचालिका सौ. शोभा कडतारे, विजयश्री गौड, तज्ञ संचालक जयप्रकाश शाळगांवकर तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.