कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिरढोणमध्ये शोकसभा
दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदरअली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण गावचे माजी सरपंच पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुश्किले असान बाबा दर्गा मध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती
.यावेळी कॉ.ऐश्र्वर्या चौगुले (लाल बावटा शिरोळ तालुका सचिव), कॉ.शशिकांत सदलगे, कॉ.अशोक जगताप, सुरेश सासणे (शेतकरी कष्टकरी संघटना संस्थापक अध्यक्ष), विश्वास बालीघाटे,डॉ.कुमार पाटील,तेजस्विनी पाटील (ग्रा.पं.सदस्या), ललिता जाधव(ग्रा.पं.सदस्या), संभाजी कोळी(ग्रा.पं.सदस्य), शिवाजी कोळी उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सासणे म्हणाले , ” शिरढोण गावामध्ये ही पहील्यांदाच अशा थोर दोन विद्वान व्यक्तीची शोक सभा कॉ.हैदरअली मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केली.त्याबद्दल मी त्याच कौतुक करतो.
तसेच यावेळी विश्वास बालीघाटे,डॉ.कुमार पाटील कॉ.हैदरअली मुजावर व पुंडलिक शिरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.