छ. संभाजी महाराज जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा ८ वा वर्धापन दिन नारशिंगे येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी :-

रत्नागिरी तालुक्यातील नारशिंगे गावात १४ मे २०२२ रोजी छ. संभाजी महाराज्यांचा जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा ८ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छ. संभाजी महाराजांना अभिषेक, आरती, भव्य रक्तदान शिबिर, हळदीकुंकू, मान्यवरांचे सत्कार समारंभ असे कार्यक्रम घेण्यात आले होते.

सदर हळदीकुंकू या कार्यक्रमात ७८महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच ७० मान्यवरांना जाणिव विशेष सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उदय बने, अभय खेडेकर, प्रतिक देसाई, रोहित मयेकर, संकेत देसाई, चंद्रकांत देसाई, प्रदिप शिवगण, दिप्ती वहाळकर, मानसी पाथरे, महेश देसाई, प्रविण कांबळे, आप्पा घाणेकर, चंद्रकांत साळवी, गणपत कांबळे, विशाखा पानगले,अंजली आग्रे, साक्षी आग्रे, सुर्यकांत कुळ्ये, शिवानंद वाणी, प्रकाश रोडे, प्रविण रोडे, रविंद्र कांबळे इ. प्रमुख उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाला ६४५ शिलेदार व रणरागीनींनी सहभाग नोंदवला होता. गेल्या ७० वर्षातील हा अविस्मरणीय कार्यक्रम नारशिंगे गावात पार पाडला असे ग्रामस्थांनी मत नोंदवून गाव प्रमुख यांच्याकडून छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सर्वेसर्वा संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांचा मंचावर सन्मान करण्यात आला व पुढिल वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे शिलेदार सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, संघटक समिर धावडे, प्रवक्ता संगम धावडे, विद्यमान सदस्य संदेश धावडे, राहुल धावडे, सचिन धावडे, प्रविण धावडे, नंदकुमार धावडे, विजय धावडे, निलेश कळंबटे, नितिन रोडे, सुदिप पवार, प्रशांत कांबळे, चंद्रकांत गोताड, सुर्यकांत गोताड, हरीश्चंद्र गोताड, प्रकाश गोताड, प्रथमेश कांबळे व ग्रामस्थ मोहन धावडे, श्रीपत गोताड, अमोल कांबळे इ. हा कार्यक्रमासाठी खुप मेहनत घेतली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×