जयसिंगपूर: विजय धंगेकर (तालुका प्रतिनिधी
निमशिरगांव तालुका शिरोळ येथे सुरू असलेल्या आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी शिवनाथ दिपक बियानी आणि बियांनी परिवांकडुन स्टील (सळई ) घेण्यासाठी एक लाख रूपयांची मदत करण्यात आली. गेल्याच आठवड्यात शिवनाथ दिपक बियानी आणि विपीन बियानी यांनी आई वृध्दाश्रमासाठी आणि नवीन चाललेल्या बांधकामासाठी पाण्याची टंचाई भासु नये यासाठी बोअर मारून दिला होता. त्या बोअरला भरपुर पाणी लागले आहे. आई वृध्दाश्रमाच्या स्थापनेपासून बियानी परिवार आई वृध्दाश्रमाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि लागेल ती मदत आणि आई वृध्दाश्रमाच्या संकटाला धाऊन येऊन सामाजिक आधार देत आहे. या बियानी परिवाराच्या दातृत्वाचा आणि सेवाभावी वृत्तीचा समाजातील सर्वच थरातून कौतुक होत आहे.
वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी अंदाजे ६ टन स्टील लागणार आहे. त्यासाठी समाजातील दानशूर लोक, संस्था, ट्रस्ट मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आई वृध्दाश्रमाचा पाच वर्षांचा चाललेला संघर्ष , संकटे , आणि प्रामाणिक सेवा सुश्रुषा , आणि त्याग हा समाजाने अगदी जवळुन पाहिला आहे. म्हणुनच आई वृध्दाश्रमातील अनाथ निराधार वृध्दांना एक हक्काचे घर मिळावे आणि आई वृध्दाश्रमाचा वनवास संपावा यासाठी समाजानेच आता पुढाकार घेतला आहे. आणि बांधकामासाठी लागणा- या बांधकाम साहित्यांची सढळ हाताने मदत करण्यात येत आहे. समाजाच्या पाठबळावर आणि दातृत्वावर लवकरच आई वृध्दाश्रमाचे बांधकाम पुर्ण होईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी व्यक्त केला आहे.
आई वृध्दाश्रमाचे आश्रयदाते आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य मा. विपीन बियानी यांनी आपल्या परिवाराकडून बोअर मारण्यासाठी आणि स्टील घेण्यासाठी एक लाख रूपये मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी आई वृद्धाश्रमाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य पत्रकार दगडु माने , इंजिनियर सचिन डोंगरे , राजेंद्र प्रधान , राहुल पोवार प्रा. गंगाराम सातपुते सर , आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले उपस्थित होते. यावेळी दिपक बियानी आणि विपीन बियानी यांनी बियानी परिवारातर्फे एक लाख रूपयांची मदत केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.