बाल सामाजिक कार्यकर्ते यांचा उपक्रम प्रेरणादायी
कोरोना योद्धा म्हणून घरी जाऊन केला सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार
कोल्हापूर:सौ रेणू पोवार
कोरोना महामारीच्या संसर्गात अनेकजण माणुसकीच्या नात्याने आणि माणुसकी हाच सेवा धर्म म्हणत आर्थिक व मानसिक आधार देण्याचं काम केले अशा लोकांचा कोरो ना योद्धा म्हणून अनेक संस्थांनी ,संघटनांनी, वृत्तपत्रांनी सत्कार व सन्मान केला .
पण असाच उपक्रम बाल सामाजिक कार्यकर्ते यांनी कोल्हापुरात करत लहानपणीच मानवसेवेची मुहूर्त मेढ रवली आहे .या बाल सामाजिक कार्यकर्ते यांनी कोरोना महामारीत मानव सेवा देणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान चिन्ह देवून घरोघरी जाऊन त्यांचा सत्कार केला.या लहान सामाजिक कार्यकर्ते यांचा विशेष कौतुक होत आहे.
कोरोना महामारीचे देशावर सावट पसरले या संसर्गामुळे काहि लोक मृत्युमुखीशी तोंड देत होती अशा वेळी प्रशासनाकडे लाँकडाऊनकेल्याशिवाय पर्याय नव्हता .तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये त्याला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लसीकरण सुरू केले. पण कोरोनाने जगायचे कसे हे शिकवून दिले माणसातला माणुस जागा केला अगदि लहान पासुन मोठ्या पर्यत आपले काय परके हे जाणुन दिले
लहान मुलाना सुध्दा वाटल कि आपण पण काहि तरी केले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन कु. गुरुप्रसाद नरके राहणार कंळबा तर्फे ठाणे ,साळोखे गल्ली ,कोल्हापूर हा दहावी शिकणारा मुलगा ,याची आई शेती करते, ऐक लहान बहिण , वडिलांच छत्रपण हरवलेलं लहान वयात शाळा शिकत बेकरी मधे काम करत , त्यातुन आपली परिस्थिती नसताना आपण काहि तरी केले पाहिजे या हेतुने आपल्या सवांगड्याच्या मदतीने श्री शिवछत्रपती ग्रुप, कळंबा मंडळ स्थापन केले. त्या मंडळा च्या माध्यमातून कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्यकर्ते , रेणु पोवार ,श्री बजरंग टिपुगडे,श्री ओमकार नरके, श्री संपत नरके यांचा घरी जाऊन सत्कार केला. यासाठी त्याला बालमित्र गु रुप्रसाद नरके साहिनाथ नरके ओम पोवार आर्यन शुभम चौगले यांचं सहकार्य लाभले.
त्याच्या ह्या उपक्रमाबद्दल त्याच व त्याच्या मित्रांचं पंच क्रोशितून कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.