भिवापूरात विलास झोडापे यांचा भव्य सत्कार

उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यांतील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण

 

नागपूर: नंददत्त डेकाटे  

  दि:२९ भिवापूर (नागपूर) येथील राष्ट्रवादी युवक माजी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे वर्धा जिल्हा प्रभारी श्री. विलासराव झोडापे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमरेड विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल भिवापूर शहर व तालुका रा.काँ. तर्फे त्यांचा गुरूवारी भव्य सत्कार करण्यात आला.उमरेड विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटनेची विस्कटलेली घडी पुर्वपदावर आणून पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने पक्षाचे जेष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष व जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. जयंतजी पाटील यांच्या सुचनेवरुन जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज उर्फ बाबाभाऊ गुजर यांनी श्री. विलास झोडापे यांची उमरेड विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने पक्षाच्या उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यांतील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

विशेष करुन युवक व महिला आघाडीतील पदाधिका-यांकडून झोडापे यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असुन ठिकठिकानी सत्कार सोहळे आयोजित करून आनंदित्सव साजरा करण्यात येत आहे.भिवापूर येथे गुरूवारला श्री.विलास झोडापे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्थानिक विश्राम गृह परिसरात आयोजित स्वागत व सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमर मोकाशी, रा.काँ.चे शहर कार्याध्यक्ष सुनिल मैदिले, महिला आघाडिच्या शहर अध्यक्षा सौ. रिनाताई बांडेबुचे, माजी तालुकाध्यक्ष सुधीर मोहोड, मनोहरराव बांते, उमरेड शहर कार्याध्यक्ष मुन्ना पटेल, श्री. महाकाळकर, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिशबाजीने झोडापे यांचे स्वागत करण्यात आले. अमर मोकाशी, सुनिल मैदिले, रिना बांडेबुचे, मनोहर बांते, सुधीर मोहोड यांनी शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन नियुक्तीबद्दल झोडापे यांचा सत्कार करुन भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात. कार्यकर्त्यांना बळ देवून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच उमरेड क्षेत्रात पक्ष संघटन मजबुत करण्याला प्रादाण्य देणार असल्याचे सत्काराला उत्तर देतांना झोडापे यांनी सांगितले. भविष्यात होवु घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका पक्ष ताकदिने लढणार असल्याचेही विलास झोडापे म्हणाले.
सत्कार सोहळ्याला सुधीर समर्थ, धिरज तांबे, दिलदार पठाण, सोमेश्वर देशमुख, समीर शेख, फिरोज खान, प्रमोद भैसारे, वानखेडे, रोशन भजभुजे, सचिन खोबरे, विक्की लाडेकर, सुरज रामटेके, प्रदिप पौनिकर, वैभव लाडेकर, राकेश पौनिकर, ईमरान पठाण, विशाल सुरईकर, देवा घुमे, प्रफुल येवले, सुरज वलके, इमरान पठाण, शैलेश राऊत, प्रदिप कुमरे, भोजराज धोटे, अभय जनबंधु, गणेश नक्षिने, अनुराग बोबडे, मनोज कुमरे, जगदिश राऊत, करण धनविजे, सोहेल रामटेके, संकेत साबळे, प्रताप ठवकर, वैभव लांजेवार, तुळशिदास डडमल, पांडुरंग राऊत, विठ्ठल कडिखाये यांसह सौ. ज्योती रामटेके, किरण पाटील, स्नेहल वाघमारे, दुर्गा वाघमारे, प्रतिभा बोदेले, नेहा अंबादे, सुनिता बावणे, प्रतिमा सोनडवले, लता टंभुरकर आदी महिला व पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर मोकाशी यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
13:46