माणगाव ग्रामपंचायतीने घेतले दोन ऐतिहासिक निर्णय
विधवांना सन्मानाची वागणूक तर लग्नादिवशी गावातील मुलीला मिळणार माहेरची साडी पैठणी भेट
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. ११ मे . हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकताच झालेल्या ग्रामसभेमध्ये दोन महत्त्वपूर्ण ठराव करत सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे चालवला आहे. सरपंच राजू मगदूम व उपसरपंच आखतर भालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. गावातील विधवांना सन्मानाची वागणूक तर लग्नादिवशी गावातील मुलींना पैठणी साडी भेट देण्याची घोषणा करण्यात आली या ऐतिहासिक घेतलेल्या निर्णयाबद्दल सरपंच राजू मगदूम उपसरपंच अख्तर भालदार यांचा पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
संध्याराणी पोपट जाधव ठरावाचे सूचक तर सुनीता अमोल मगदूम या अनुमोदक आहेत हा ठराव होण्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्य संध्याराणी जाधव यांनी याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली आहे या ठरावामुळे विधवांना समाजात योग्य स्थान मिळणार आहे.गावातील मुलगी लग्न होऊन सासरी जाताना ग्रामपंचायतीच्या वतीने आशीर्वाद व सन्मानपूर्वक भेट म्हणून लग्नाच्या दिवशी मुलीला अडीच हजार रुपये किमतीची पैठणी साडी ग्रामपंचायत मार्फत देण्याचा ठराव करण्यात आला आहे. माणगाव ग्रामपंचायतीचे हे दोन ऐतिहासिक निर्णय राज्यपातळीवर आदर्शवत ठरणार आहेत.सातत्याने वैविध्यपूर्ण योजना राबवणारे आणि ग्रामविकासाच्या अभिनव संकल्प साकारणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव या ग्रामपंचायतीने विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून हे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्र दिनाचे अवचित्त साधून माणगाव ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला.त्याच बरोबर लग्नानंतर सासरी जाणाऱ्या मुलीला ग्रामपंचायतीकडून पैठणी साडी दिली जाणार आहे माणगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत त्याचबरोबर गावातील नागरिकांना शिस्त लागावी यासाठी अनेक नियम तयार केले आहेत वेळेवर कर भरणे,शोषखडातयार करणे, वृक्षलागवड करणे,अशा अनेक योजनांसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले आहे.
सरपंच राजू मगदूम यांनी माणगावचा राज्यात नावलौकिक व्हावा व तळागळातल्या ग्रामस्थांच्या जिवनात सुख समृद्धी यावी याकरीता गावातील ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध राहून धाडशी निर्णय घेत वाटचाल सुरू ठेवल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व पदाधिकारी हे ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.