रत्नागरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन चोरट्यांना घेतले ताब्यात

पोलिस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे केले अभिनंदन

 

 

 

रत्नागिरी : सिद्धेश मराठे  शहर प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर असलेले निर्बंध शिथील केल्यानंतर अलीकडील कालावधीत चोरी व घरफोडी असे गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभुमीवर दि.१६/०९/२०२१ रोजी पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांची बैठक घेवुन गुन्ह्यांचा आढावा घेवुन मार्गदर्शनपर सुचना केल्या होत्या. या पार्श्वभुमीवर दि.२५/०९/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या शाखेच्या पोलीस अंमलदारांनी खंडाळा, ता.रत्नागिरी येथे दोन संशयीत इसमांकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे (१) अमित रविंद्र भोसले, वय २२ वर्षे, रा.- रिंगी फाटा, खंडाळा, ता.व जि.- रत्नागिरी आणि (२) प्रशांत प्रकाश विर, वय १९ वर्षे, रा.- कळझोंडी, वीर वाडी, ता.व जि.- रत्नागिरी असे सांगीतले. त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांनी खालील नमुद दोन घर फोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.नों.क्र .४५८/२०२१, कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.सं. दि.२३/०९/ २०२१ रोजी ते दि.२४/०९/ २०२१ रोजीचे दरम्यान रात्री मोबाईल वर्ल्ड, शंकेश्वर प्लाझा, नाचणे रोड येथील दुकानाचे शटर उचकटुन, आत प्रवेश करुन १२ मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम चोरीस गेली होती. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी १२ मोबाईल हॅन्डसेट, एक ब्लु टुथ इयर फोन व रोख रक्कम रु. १५,७००/- असा एकुण रु. १,७५,२००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे, यातील अटक आरोपी (१) अमित रविंद्र भोसले, वय २२ वर्षे आणि (२) प्रशांत प्रकाश विर, वय १९ वर्षे यांना आज दि.२६/०९/ २०२१ रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दि.२९/०९/ २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि. मनोज भोसले हे करीत आहेत.
तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.नों.क्र .४३८/२०२१, कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.सं. दि.०६/०९/ २०२१ रोजी ते दि.०७/०९/ २०२१ रोजीचे दरम्यान रात्री दुर्गा टायर दुकान व दर्पण फोटो स्टुडिओ येथील दुकानांचे शटर उचकटुन व दुकानाचा पत्रा उचकटुन, आत प्रवेश करुन टायर व कॅमेरा अशी मालमत्ता चोरीस गेली होती. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी ६ टायर्स आणि कॅमेरा व इतर साहीत्य असा एकुण रु.१५,८८०/- मुद्देमाल जप्त केला आहे. वरील गुन्हे करताना यातील आरोपींनी महिंद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक (किं.सुमारे रु.४,००,०००/-) वापरला असल्याने, तो सुध्दा सदर गुन्ह्यात जप्त केला आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

वरील कामगिरीत चाफे गावाचे पोलीस पाटील हिराजी तांबे यांचे सहकार्य लाभले. या कामगिरीत उल्लेखनीस कामगिरीत सहभाग घेतलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोह.शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, पोना.रमीज शेख, पोशि.अतुल कांबळे यांचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी अभिनंदन केले आहे आणि या पुढेही अशीच उल्लेखनीस कामगिरी करण्याबद्दल प्रोत्साहीत केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×