राज्यमंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

रुग्णांवर शासकिय योजनेतून मोफत होणार उपचार:अनिल बागणे :

यड्राव: प्रतिनिधी

दि. ४ मे  महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या ५ मे रोजी होत असलेल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील जनतेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तालुक्‍यात एकूण १६ ठिकाणी हे शिबिर होत असून सर्व केंद्रावर त्यांच्या शेजारच्या गावातून नागरिकांना आणण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे.

जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तिन्ही शहरांसह चिपरी, नांदणी, यड्राव, अब्दुललाट, टाकळी, दत्तवाड, अर्जुनवाड, अकिवाट, आलास, कवठेगुलंद,दानोळी, शिरटी, उदगांव या सर्व केंद्रांवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३० नामांकित रुग्णालयांच्या सहभाग राहणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी शिरोळ तालुक्यात साजरा केला जाणार असून महाआरोग्य शिबिराचे आयोजन शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

या शिबिरातून निदान झालेल्या बाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार असून गंभीर आजारावरील रुग्णांसाठी मुंबई मधील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केली जाणार असल्याची माहितीही श्री. बागणे यांनी शेवटी दिली आहे.तालुक्‍यासह इतर सर्वच नागरिकांना या शिबिराचा लाभ होणार असून अनेक गरजू व गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे असे पत्रकात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×