राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची आदर्श शाळा संगमेश्वर नं-3 येथे सुरुवात

देवरुख: अजित गवाणकर
दि २३फेब्रुवारी.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , संगमेश्वर च्या पाचव्या ” निवासी श्रमसंस्कार शिबिराचे ” सुरुवात दत्तक गाव – कसबा येथील जि.प.आदर्श शाळा संगमेश्वर नं-3 , कसबा बौध्दवाडी येथे झाली.
श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात उद्घाटनाच्या कार्यक्रमाने झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या- श्रीम.रुपाली आणेराव , कसबा ग्रामपंचायत सरपंच – पूजा लाणे , माजी सरपंच – अनंत शिगवण, ग्रामविकास अधिकारी आर.एन.खंडागळे , ग्रामपंचायत सदस्या – अक्षता शिगवण , जितेंद्र पेंढारी , कसबा गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष – प्रशांत तांबे , ज्येष्ठ पत्रकार व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष-वहाब दळवी , ग्रामपंचायत माजी सदस्या-सुनिता तांबे , पंचायत समिती माजी सदस्या – मंगल तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- प्रकाश कदम , कसबा बौध्दजन विकास मंडळाचे अध्यक्ष-केशव तांबे , सचिव – धर्मचंद्र तांबे , कसबा बौध्दजन ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष – रूपेश तांबे , आम्रपाली महिला मंडळ अध्यक्षा- सुरेखा तांबे , माता रमाई महिला मंडळाच्या सारिका तांबे , जाखमाता मंडळ लावगणवाडीचे – श्रीराम पवार , दीक्षा पवार , के.बी.सी.सी तरुण मंडळाचे – तुषार तांबे , शाळेचे मुख्याध्यापक -भानुदास ढेंगळे, अंगणवाडी मदतनीस – मनीषा तांबे , सपना तांबे तसेच सर्व महिला मंडळांचे सर्व सदस्य , पालक , ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अनिल नेमन यांनी शिबिराचा हेतू काय आहे हे उपस्थित सर्वांना आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून स्पष्ट केले , नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष-अभिजित हेगशेट्ये यांनी शिबिरासाठी सर्वांना शुभेच्छा संदेश दिला .
उदघाटन कार्यक्रम प्रसंगी शिबिराच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षा झेपले , महाविद्यालयाचा संपूर्ण प्राध्यापक वर्ग देखील उपस्थित होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच पूजा लाणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व जेष्ठ अध्यक्ष केशव तांबे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
शाळेचे सहशिक्षक आदम सय्यद यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×