रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी सत्तारूढ  गटाचा दणदणीत विजय

कबनूर : चंदुलाल फकीर

दि. १७ मे. :रुई येथील रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलने अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकतर्फी दणदणीत विजय संपादन केला.
          या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीचे पॅनेलने विरोधी शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला. सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीचे पॅनेलने सर्व १७ जागा जिंकून सत्ता हासिल केली. विजयी उमेदवारांनी २०० पेक्षा जादा मतांच्या फरकाने विजय संपादन केला आहे.विकास सोसायटीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक रविवारी झाली होती.

गेल्या काही वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीचा सत्तारूढ गटाने प्रचाराचा मुद्दा केला होता. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांचा योग्य सन्मान केल्यामुळे निवडणुकीत पहिल्यापासून  सत्तारूढ गटाचे वर्चस्व दिसत होते. विरोधकांनीही सत्ता बदलण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या निवडणुकीमध्ये संपूर्ण सत्तारूढ पॅनेलला विजयी करण्यासाठी संजय मगदूम, जहांगीर मुजावर, अनिल जाधव, इंजिनीयर शकील मुजावर,राजाराम झपाटे सर, महादेव आपराध, जयसिंग शिंदे, बाबासो पवार आदिने अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळली होती पॅनल विजयी होण्यासाठी या सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले.
निवडणुकीमध्ये  विजयी झालेले उमेदवार असे महादेव अपराध,पुंडलिक कमलाकर,अनिल जाधव,सुर्यकांत पोतदार,कल्लाप्पा बेनाडे, संजय मगदूम,डॉक्टर अफसाना मुजावर,जहांगीर मुजावर,समशेर मुजावर,अनिल साठे,मन्सूर सुतार, दगडू सुर्वे,प्रकाश आंबी,रामचंद्र परीट,दगडू कांबळे,हौसाबाई मगदूम,शकुंतला शिंदे विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×