सत्तूराने सपासप वार करून केला पत्नीचा खून

कर्जबाजारी झालेल्या नवऱ्याचा प्रताप

हुपरी– प्रतिनिधी

दि २५ जानेवारी :कोरोची ता हातकणंगले येथील कर्जबाजारी झालेल्या पतीने सत्तूराने  पत्नीवर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना हुपरी येथे घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं समिना इम्तियाज नदाफ आणि पती इम्तियाज राजु नदाफ यांच्यात काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. या वादातून पती इम्तियाज याने स्वत:च्या पत्नीचा धारधार शस्त्राने वार करून मंगळवारी रात्री खून केला. समिना नदाफ या आपल्या वडीला सोबत चिकन-६५ चा व्यवसाय करत होत्या. त्या रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास चिकन- 65 च्या गाडीवर काम करत असताना अचानक दारू पिऊन आलेल्या पती इम्तियाजने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या पत्नी समिना नदाफ या धावत शेजारील कपडे इस्त्रीच्या दुकानात शिरल्या असता तीचा पाठलाग करुन तिच्या अंगावर गळयावर खांद्यावर वार केले आणि गळा चिरून खुन केला. यावेळी अडवण्यास आलेल्या समिनाचे वडील यांच्याही हातावर वार करून त्यांनाही जखमी केले. या हल्ल्यात पत्नी समिना नदाफ ही जाग्यावरच मयत झाली असून तीचा पती इम्तियाज यास हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अधिक तपास हुपरी पोलिस करत आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
09:20