छाया कॉर्नर नागरी सह पत संस्थेची ३६ वी वार्षिक सभा संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि .१० :सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या हेतुने कर्जाच्या रूपाने आर्थीक पाठबळ देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम एक आदर्श पत संस्था म्हणून छाया कॉर्नर नागरी सहकारी पत संस्थेचे उल्लेख अग्रक्रमाने घेणेत यावा असे गौरोवोदगार इंटक नेते श्री शामराव कुलकर्णी यांनी काढले. येथील छाया कॉर्नर नागरी सहकारी पल संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक  संचालक श्री अनिल मगदूम यांनी केले. संस्थेचे मार्च २०२४ अखेर वसुल भागभांडवल ६२ लाख, फंडस् २ कोटी ४१ लाख, ठेवी ५ कोटी ८७ लाख, गुंतवणुक ४ कोटी ४३ लाख, कर्जे ४ कोटी ९७ लाख, खेळते भांडवल १० कोटी ४४ लाख आहे असे अहवाल वाचन करताना संस्थेचे चेअरमन श्री सचिन डाळया यांनी सांगितले. संस्थेकडील सर्वच सभासदांना संस्था स्तरावर त्यांना सक्षम करणेसाठी मागणी प्रमाणे कर्ज पुरवठा केलेला आहे परंतू घेतलेली कर्जे हि वेळेत परतफेड करून संस्थेस सहकार्य करावे जेणेकरून येथुन पुढील काळातही संस्था अधिक सक्षम होईल व संस्थेच्या सभासदांना डिव्हीडंड देणे सोईचे होईल असे संस्थेचे संस्थापक मा. सतिज्ञभाऊ डाळया यांनी सभेप्रसंगी सर्व सभासदांना आवाहन केले. विषयपत्रिकेवरील विषय वाचन मॅनेजर श्री सुनिल भोसले यांनी केले यास सर्व सभासदानी एकमताने मंजुरी दिन्नी .

अहवाल सालात  दिवगंत झालेले संस्थेचे सभासद, हितचिंतक, इतर ज्ञात अज्ञात, भारतीय जागतिक कीर्तीचे  शास्त्रज्ञ, थोर साहित्यिक, राजधुरंधर नेते, सामाजीक कार्यकर्ते यांना संचालक श्री नझीर मैंदर्गी यांनी सभेत श्रद्धांजली  अर्पण केली. सभेप्रसंगी श्री अहंमद मुजावर, श्री बापूसाहेव तेरदाळे, श्री सर्जेराव पाटील, श्री मनोहर हिराणी, श्री राजेंद्र बचाटे, श्री बाळासाहेव कलागते, श्री सुभाष जाधव, सी ए एन ए वसुदे, संचालक श्री श्रीकांत सारडा, श्री नागराज शेट्टी, श्री सौरभ जाधव, श्री सतिश काळे, श्री यशवंत शेळके, श्री अनिल बडवे, श्री इकबाल गवंडी, छाया परीवार, सभासद, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी इंटक नेते श्री शामराव कुलकर्णी यांचा समाजसेवा व कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबददल इचलकरंजी ब्राह्मण सभेतर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेवद्दल संस्थेच्या       वतीने  सत्कार करणेत आला. व सर्व सभासदांच्या तर्फे संस्थेचे चेअरमन श्री सचिन डाळया यांचा सत्कार करणेत आला. सुत्रसंचलन श्री सुरेंद सुर्यवंशी (सर) यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक श्री शाम डाळ्या यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×