5 हजाराची लाच स्वीकारताना पोलिस नाईक लाचलुचपत च्या जाळ्यात

कोल्हापूर: सौ रेणूताई पोवार

दि 27 :जबरदस्तीने घेवून गेलेली चारचाकी इनोवा गाडी मध्यस्थी करून परत देण्यासाठी 15000 हजाराची लाच स्वीकारताना शाहूपुरी पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस नाईक सागर कोळी वय वर्ष 43 राहणार श्रीरामनगर उच गाव याला त्याब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असुन त्यांनी श्री नितीन कदम यांची इनोव्हा गाडी वापरणेस आणली होती. दि. २५/१०/२०२१ रोजी माकडवाला वसाहतीतील तानाजी व इतर लोकांनी नितीन कदम आमचे पैसे देणे बाकी आहे असे सांगून इनोव्हा गाडी जबरदस्तीन घेवुन गेले. त्यामुळे तक्रारदार हे मित्रासह माहुपूरी पोलीस ठाणेस गाडी चोरीची तक्रार देण्यास गेले असता तेथे उपस्थित पोलीस नाईक सागर कोळी यांनी दोघांमधील वाद मिटवून इनोव्हा गाडी तक्रारदार यांना देणेस सांगितली. पोलीस नाईक कोळी यांनी तक्रारदार यांचेकडे इनोव्हा गाडी परत मिळवून देणेकरीता १५,०००/- रू ची मागणी करून तात्काळ १०,०००/-रू मागितल्याने त्यांनी ते दिले व उर्वरीत ५,०००/-रू घेवुन येण्यास सांगितले.
त्याअनुषंगाने तक्रारदार यांची शाहुपूरी पोलीस ठाणेतील पोलीस नाईक श्री सागर कोळी यांनी ५,०००/- रु. लाचेची मागणी केलेबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीप्रमाणे पडताळणी केली असता पोलीस नाईक सागर कोळी यांनी ५,०००/- रू लाचेची मागणी करून ती लाच रक्कम तक्रारदार यांना घेवुन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झालेने त्यांचेविरूध्द सापळा कारवाई आयोजित केली असता, दिनांक २६/१०/२०२१ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेच्या बाहेरील आवारात शासकीय पंच साक्षीदारांचे समक्ष दिनांक २६/१०/२०२१ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेच्या बाहेरतक्रारदार यांचेकडून ५,०००/- रू. लाच रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडणेत आले आहे. सदरबाबत आरोपी लोकसेवक सागर इरप्पा कोळी पोलीस नाईक ब.नं. ५७९ नेमणूक शाहुपूरी पोलीस ठाणे, वय ४३, कोल्हापूर, वर्ग -३, रा. श्रीरामनगर, उचगांव ता.करवीर जि. कोल्हापूर यांचेविरूध्द शाहुपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे.सदरची कारवाई श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे व श्री. सुहास नाडगौंडा, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, श्री आदिनाथ बुधवंत, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार श्री सतिश मोरे, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, सफौ. संजीव बंबरगेकर, पो.हवा. अजय चव्हाण, पो.ना. कृष्णात पाटील, पो.कॉ.रूपेश माने, चालक/ पोहेकॉ सुरज अपराध अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×