१ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात ठाणे तहसिलदारांकडून ५ मोठ्या कारवाया.. अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई

ठाणे तहसिलदार इन ॲकशन मोड

ठाणे:प्रतिनिधि

दि:३१:जुलै:  १ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात सलग ५ वेळा वाळूमाफियांवर कारवाई करुन वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभागाने आवळल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट सुटला होता. अश्यातच उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या उपस्थितीत नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली असून सोमवारी केलेल्या कारवाईत दोन बोटी पाण्याच्या बाहेर काढून त्या बोटींची विलेवाट लावून बोटी नष्ट करण्यात आल्या.

एक मुंब्रा खाडी शेजारी तर दुसरी खारीगाव गणेश घाट अश्या दोन ठिकाणी ह्या बोटीची विलेवाट लावण्यात आली, केलेल्या कारवाई बद्दल जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे व तहसिलदार युवराज बांगर यांच्याकडून नायब तहसिलदार दिनेश पैठणकर व तलाठ्यासह संपूर्ण टीमच कौतुक केले आहे. अश्या प्रकारच्या कारवाईने वाळूमाफियांना धाक बसेल असे उपविभागीय अधिकारी विकास गजरे व नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

या कारवाई वेळी उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसिलदार युवराज बांगर, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मंडळ अधिकारी श्रीमती चौरे, रोकडे, जगताप अण्णा, महेंद्र पाटील, राजेश नरोटे, तलाठी सोमा खाकर, सतीश चौधरी, जाधव, खानसोळे, राहुल भोईर, कल्पेश ठाकरे, सतीश चौधरी, रोहन वैष्णव, रत्नदीप कांबळे, विजय गढवे, निलेश कांबळे, बसवराज गुंजीटे, ईश्वर जाधव, अरुण कासार, अनिल यादव, महिला धनश्री जाधव, मंगला खाडे, सुखदा शिरकर, मसूरकर, धोंडीबा खानसोळे, राहुल भटकर, राठोड उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
11:29