देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत
चेअरमन पी. एम. पाटील यांनी विरोधकांनी केलेले आरोप व त्यांच्या प्रश्नांचाही केला सविस्तर खुलसा
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि .१६ :येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पंचरत्न सांस्कृतिक भवनात खेळीमेळीत पार पडली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय हात उंचावून व आवाजी मतदानाने मंजूर केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन पी. एम्. पाटील हे होते.
चेअरमन पी. एम. पाटील यांनी प्रास्ताविकात स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कार्याचा व कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, रेणुका शुगर्सने कारखान्याचे आधुनि-कीकरण करत काराखान्याची दररोजची ऊस गाळप क्षमता ५००० मे. टनावरुन ती ७५०० मे.टन केली आहे. यामध्ये कारखान्यास एक रुपयाही गुंतवणूक करावी लागली नाही. भाडे करार संपताच हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होणार आहे असे सांगून सभासदांनी केलेल्या सूचनांना समर्पक उत्तरे दिली. तसेच विरोधकांनी केलेले आरोप व त्यांच्या प्रश्नांचाही सविस्तर खुलसा केला. त्यामुळे विरोधकानीही सभेत विरोध केला नाही. त्यामुळे सभा खेळी-मेळीत पार पडली.
प्रथम स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कारखान्याचे प्र.का. संचालक यानी स्वागत करून नोटीस वाचन केले. यानंतर चेअरमन पी.एम. पाटील यांनी सभेपुढील एक एक विषय वाचले. त्यास सभासदांनी मंजुरी दिली.
यावेळी व्हा. चेअरमन जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, प्रताप उर्फ बाबा पाटील, प्रमोद पाटील, एम. आर पाटील, प्रताप नाईक, भूपाल मिसाळ, संतोष महाजन, सुनिल तोरगल, प्रकाश खोबरे, रंजना निंबाळकर, शोभा पाटील, सभासद आदि उपस्थित होते. संचालक रावसाहेब भगाटे यानी आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.