सन्मती सहकार बॅकेची २७ वी वार्षिक सभा उत्साहात

गत आर्थिक वर्षात 3 कोटी 13 लाख रुपये इतका ढोबळ नफा : चेअरमन सुनिल पाटील

इचलकरंजी: विजय मकोटे
   संपूर्ण जगावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या महासंकटामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदिचे चित्र निर्माण झाले. बँकींग क्षेत्रही त्याला अपवाद उरले नाही. परंतु सन्मती बँकेचे व्यवस्थापन, सभासद ठेवीदारांचा विश्‍वास आणि नियोजनबद्ध केलेले आर्थिक नियोजन यामुळे सन्मती सहकारी बँकेला गत आर्थिक वर्षात 3 कोटी 13 लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन सुनिल पाटील यांनी दिली.
          बहुराज्यीय असलेल्या सन्मती सहकारी बँकेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होेते. ते म्हणाले, कोरोना महामारी आणि महापुराचे संकट यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार, शेतकरी यांच्यावर मोठा विकृत परिणाम झाला. आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली. तरी देखील बँकेच्या संचालक मंडळाने अभ्यासपूर्ण आणि धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी केली. परिणामी अहवालसालात बँकेचा व्यवसाय 27.31 कोटींनी वाढला. ठेवींमध्ये देखील 30 कोटींनी वाढ झाली. त्यामुळे एकूण ढोबळ नफा 3 कोटी 13 लाख इतका झाला. केवळ कर्ज वाटप आणि वसुली हा उद्देश न ठेवता समाजातील शेवटचा घटक स्वत:च्या पायावर कसा उभा राहिल यासाठी बँकेने यापूर्वीही धोरणे राबवले आहेत. भविष्यातही अशा घटकांना बळ देण्याचे काम निश्‍चीत स्वरूपात करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच बँकेचे स्वतंत्र आएफसी कोड, युपीआय, मोबाईल बँकींग, पीटीएम, जीपे या सुविधा अल्पावधीतच ग्राहकांना पुरवण्यात येणार आहेत.
 प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी केले. अहवाल सालात निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. त्याला उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. सुत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर आभार व्हा. एम.के. कांबळे यांनी मानले. सभेस बँकेचे संचालक अजित कोईक, धुळासाहेब चौगुले, शितल पाटील, डॉ. प्रद्युम्नकुमार कडोले, आदाप्पा कुरूंदवाडे, डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, शिवाजी माळी, विठ्ठल चोपडे, आण्णासो मुरचिट्टे, चंद्रकांत पाटील, प्रदीप मणेरे, डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, संजय चौगुले, आप्पासाहेब पाटील, हनमंत उर्फ गिरीष देशपांडे, जयश्री चौगुले, वसुंधरा कुडचे, राजाराम कोठावळे, मनिष पोरवाल, महावीर यळरुटे, असि.सीईओ समीर मैंदरगी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार यांच्यासह मान्यवर, सभासद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×