पतसंस्थेशी सलग्न होवून नागरीक सक्षम व्हावेत : अनिल बागणे
सक्षम पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
जयसिंगपूर:प्रतिनिधी
दि १७ :”पतसंस्था ह्या समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात. त्यामुळे समाजातील अनेक लोकांची आर्थिक नड निघते. त्यामुळेच अल्पावधीत सक्षम पतसंस्थेने तीन शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळविला आहे. सर्वांनी ह्या पतसंस्थेशी सलग्न होवून आपल्या जीवनात सक्षम व्हावेत हि अपेक्षा.” असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे यांनी केले. ते सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधरण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष महावीर खवाटे, सर्व संचालक प्रमुख उपस्थीत होते.
श्री. बागणे म्हणाले, “आर्थिक संस्था ह्या ठेवीदार व कर्जदार यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असतात. त्या पारदर्शकपणे चालवल्यास सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह संस्थेला हि फायदा होता. नागरीकांच्या विश्वासामुळेच अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल करत असून समाजाच्या विकासासाठी आपली संस्था काम करीत आहे.” यावर्षीपासून सभासदाना लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सभेपुढे ठेवलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच सभासद व सभासदांचे पाल्य यांनी प्राविण्य मिळविले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक कुबेर मगदूम यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी संचालक अनिल चव्हाण, दामोदरप्रसाद मालपाणी, विजयकुमार पाटील, वर्धमान पाटील, शेखर देशपांडे, शीलकुमार पाटील, विजित पाचोरे, मनोज पाटील, स्वप्निल हेरवाडे, सहदेव कांबळे, मिनल सौंदत्ते यांच्यासह सभासद, सेवकवर्ग उपस्थीत हेते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.