कडवई विभागात शिवसेना (उबाठा) व युवासेनेच्या मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न – गणेश साळवी यांचा विशेष गौरव
रत्नागिरी: २८/०९/२०२४
कडवई विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव यांच्या घरी २१ दिवसाच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गणेश दशरथ साळवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. साळवी यांनी त्यांच्या देखाव्यातून समाजाला विचार करायला लावणारा सामाजिक संदेश दिला आणि उत्कृष्ट मखर तयार केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक सुमित थेराडे यांना त्यांच्या “पंढरपूर दर्शन” या देखाव्यासाठी देण्यात आला. तृतीय क्रमांक अभिषेक खातू यांना “केसरी वाडा” प्रतिकृतीसाठी प्राप्त झाला, तर रोशन रामाणे यांना “रामसेतू” देखाव्यासाठी चतुर्थ क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस जगदीश धामणस्कर यांना त्यांच्या “कोकण रेल्वे” या देखाव्यासाठी प्रदान करण्यात आले.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे, माजी शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख सुरेखा खेडेकर, कडवई शिवसेना विभाग प्रमुख अनंत उजगावकर, ठाणे उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव, कडवई उपविभाग प्रमुख दत्ताराम लाखन, उपविभाग प्रमुख अरविंद जाधव आणि शाहीर विजय कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे संतोष थेराडे यांनी युवासेनेच्या या मखर स्पर्धेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजात होत असलेल्या सकारात्मक कार्याबद्दल युवासेनेचे अभिनंदन केले. विशेष सहकार्याबद्दल ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन निलेश कुंभार यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.