वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह इ इचलकरंजी येथे फ्लाईंग ट्रेनिंग स्कूलची निर्मिती केली जाईल,
नामदार मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .११ :देशात आणि राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि कल्याणकारी योजनांच्या बळावर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल. मराठा आरक्षणासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही. आरक्षणाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले. ते न्यायालयातही टिकले. मात्र सरकार बदलल्यानंतर आरक्षण गेले. आता पुन्हा महायुतीचे सरकारच मराठा आरक्षण देऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय सहकार व नागरी उड्डान राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. इचलकरंजीतील विकासाच्या संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी उच्चांकी मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह याठिकाणी फ्लाईंग ट्रेनिंग स्कूलची निर्मिती केली जाईल, अशी ग्वाही दिली.
२७९इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजयुमोच्या वतीने रविवारी नामदेव भवन मैदान येथे ‘युवा संवाद मेळावा’ पार पडला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना नामदार मुरलीधर मोहोळ बोलत होते.
नामदार मोहोळ यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेनुसार भारत हा सर्वाधिक तरुण देश असणार आहे. त्यासाठीच युवांना संधी दिली जात आहे. विकसित भारताचा संकल्प हा तरुणच पूर्ण करु शकतात हा विश्वास मोदींना आहे. युवकांना रोजगार मिळण्यासाठी अर्थसंकल्पात 2 लाख कोटीची तरतूद केली. 1 लाख तरुणांना टॉप कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. त्याच अनुषंगाने राहुल आवाडे यांना तरुण आमदार म्हणून विधीमंडळात पाठविण्याचा विजयी संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले. राज्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख कोटी विकासकामांसाठी दिले. शिवाय 1 लाख कोटीच्या निधीतून रेल्वेसाठीची विकासकामे सुरु आहेत. शेतकर्यांना दिलासा देण्यासह विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात सर्वाधिक असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून साखर कारखान्यांसह सर्वच उद्योगांना बळ दिले. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणास भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकार 212 कोटी देईल तर अन्य कामांसाठी केंद्र सरकार 380 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आणि विस्तारीकरणानंतर वस्त्रनगरीच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला. त्याचबरोबर भविष्यात इचलकरंजीत दोन आमदार असतील असे सांगत सुरेश हाळवणकर यांना मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले. सहकार मंत्रालयाकडून चुकीच्या माणसांना मदत केली जात असल्याची टीका आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नामदार मोहोळ यांनी राजारामबापू साखर कारखान्यासाठी मोदी यांच्या काळात गत दहा वर्षात 1442 कोटी रुपये का घेतले असे सांगत खरे लाभार्थीच असल्याचा टोला लगावला.
खासदार धैर्यशील माने, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भगवा डौलाने फडकण्यासाठी राहुल आवाडे यांनी साथ द्यावी. विषारी प्रचार आणि जातीवादाला बळी न पडता मतदारसंघात विकासाचे धोरण आखण्यासाठी महायुतीची गरज आहे. ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही त्यांना आता रामकृष्ण हरी आठवत फिरताहेत दारोदारी असा टोला लगावत आपल्याला विकासात्मक व रचनात्मक कामासाठी राहुल आवाडे यांना विजयी करावे. तसेच पक्षासाठी त्याग करणार्या सुरेश हाळवणकर यांना उच्च पदावर नेण्याची जबाबादारी आपल्या सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.
आमदार प्रकाश आवाडे, विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने ते जुन्या कढीला ऊत आणत व्यक्तीगत टीका करत आहेत. आता टीकांचा भडीमार नव्हे तर कडेलोट होईल. अन् ज्यावेळी ते व्यक्तीगत आणि समाज टीकेवर येतील त्याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते संपले असून हताश व निराश झाले आहेत. काहीही न करता आम्ही केलं म्हणून ओरडून सांगत आहेत. पण मी, सुरेश हाळवणकर आणि अशोक स्वामी यांनी मिळून वीज सवलतीचा प्रश्न मार्गी लावला. विरोधकांकडून केवळ राजकारण केले जात आहे. सुळकुडचा प्रलंबित प्रश्नी मी, हाळवणकर व खासदार धैर्यशील माने मिळून निश्चितपणे मार्गी लावू. या निवडणूकीच्या निमित्ताने विरोधकांचा समारोपच होईल यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, आधुनिकतेच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. त्याच अनुषंगाने मोदींनी उमदा तरुण म्हणून राहुल आवाडे यांना संधी दिली आहे. युवकांचा प्रतिनिधी म्हणून युवा आमदार करण्याची संधी आपल्याला मिळाली असून सर्वांनी मिळून राज्यातील उच्चांकी व विक्रमी मताधिक्याने राहुल आवाडे यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
राहुल आवाडे, इचलकरंजीच्या सर्वागिण विकासासाठी आणि युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहेत. त्यासाठी सर्वांनी मिळून मला विक्रमी मताधिक्यांनी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले.
यावेळी आमदार सौ. शशिकला जोल्ले, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, अनिल डाळ्या, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी राजवर्धन नाईक-निंबाळकर, अमरिंदर सिंग, सुदर्शन पाटसकर, अरविंद माने, पै. अमृत भोसले, श्रीरंग खवरे, अनिल डाळ्या, आदित्य आवाडे, सानिका आवाडे, सौ. अश्विनी कुबडगे, सौ. उर्मिला गायकवाड, सौ. मीना बेडगे, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, नितीन पडीयार, नितेश पोवार, सुरज राठी, सचिन लायकर, तात्या कुंभोजे, अभिषेक वाळवेकर, हेमंत वरुटे, रवी जावळे, वैभव हिरवे, नामदेव सातपुते, मनोज तराळ, शुभम बरगे, सतिश मुळीक, अरुण कुंभार आदींसह युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.